ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवा

शिवप्रेमींची मागणी.!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव मही येथील समस्त शिवप्रेमी तथा राजा शिवछत्रपती विचारमंचाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव मही येथील सरपंचा ज्योत्स्ना वसुदेव शिंगणे व सचिव यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे गावाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व सार्वजनिक महत्त्वाचे स्थळ असून ते ग्रामस्थांच्या श्रद्धा व अस्मितेशी निगडित आहे. सदर स्मारक परिसरात नियमितपणे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ असते तसेच विविध जयंती, पुण्यतिथी व सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतात.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 अन्वये ग्रामपंचायतीवर गावातील सार्वजनिक स्थळांची देखभाल, संरक्षण व सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची वैधानिक जबाबदारी आहे.

सदर स्मारक परिसरात कोणत्याही प्रकारचे विघातक, असामाजिक किंवा तोडफोडीचे प्रकार होऊ नयेत तसेच भविष्यात अशा घटना घडल्यास त्याबाबत पुरावा उपलब्ध राहावा या दृष्टीने स्मारकासमोर व परिसरात उच्च प्रतीचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे अत्यावश्यक व तातडीचे आहे.

सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविल्यास सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण प्रभावीपणे होईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. संभाव्य गुन्हेगारी कृत्यांवर प्रतिबंधात्मक परिणाम होईल. आवश्यकतेनुसार तपास यंत्रणेस सहकार्य करता येईल.

त्याअनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच सचिव सदस्य यांनी सदर मागणीचा तात्काळ विचार करून आवश्यक प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद करून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.याबाबत गांभीर्याने लक्ष देण्यात यावे अन्यथा भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशारा ही देण्यात आला.

सदर निवेदनावर, वसुदेव पाटील शिंगणे,नितीन शिंगणे,राम शिंगणे, बळीराम शिंगणे, रंगा शिंगणे, देवा पाटील शिंगणे,दीपक शिंगणे,किशोर शिंगणे, निखिल शिंगणे,मधुकर शिंगणे,बळी शिंगणे,विजयराज शिंगणे, सौरव सोनसळे,सुरेश शेळके,निशांत देशमुख,ऋषी शिंगणे, भागवत शिंगणे,ज्ञानेश्वर शिंगणे,यांच्या सह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये