जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, वर्धा यांची कुख्यात गुंड विरुध्द बेधडक मोहीम
पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) येथील कुख्यात गुंडाची एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत जिल्हा कारागृह, भंडारा येथे रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) हद्दीतील बोरगाव (मेघे), वर्धा ता. जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड नामे अनित उर्फ अजय उर्फ अजिज उर्फ अण्णु उर्फ तोताल्या वासुदेव राठोड, वय २७ वर्ष, राह. बोरगाव (मेघे) वर्धा ता. जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) चे अभिलेखावर शरीराविरुध्द, मालमत्तेविरुध्द, हत्यार कायदा, जुगार कायदा, एन.डी.पी.एस. अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत सन २०२१ पासून एकुण २५ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये हदपार असतांना सुद्धा प्रतिबंधीत श्रेत्रात प्रवेश करुन शस्त्र बाळगुन दहशत पसरवीणे, गैरकायद्याची मंडळी जमवून जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, दुखापत करुन जबरी चोरी करणे, वरली मटक्याचा जुगार खेळ चालवीणे, गांजा अंमली पदार्याचे सेवन करणे, भारतीय दंड संहीता व भारतीय न्याय संहीता तसेच भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हे करणे, परीसरात दहशत निर्माण करणे, सार्वजनीक शांतता भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो सतत गुन्हे करण्याच्या सबईचा गुन्हेगार आहे. त्या पैकी ०१ गुन्हा पोलीस तपासावर असुन २४ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ०७ वर्षापासुन स्थानबध्द ईसम नामे अजित उर्फ अजय उर्फ अनिन उर्फ अन्जु उर्फ तोतल्या बासुदेव राठोड हा बोरगाव (मेघे), वर्धा ता. वर्धा जि. वर्धा परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. अजित उर्फ अजय उर्फ अजिन उर्फ अज्जू उर्फ तोतल्या वासुदेव राठोड राह. बोरगाव (मेघे) वर्धा ता. जि. वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, वर्धा (शहर), पोलीस स्टेशन, सावंगी (मेघे) अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचेविरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा, कलम ५६ (१) (अ) (थ) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्यये हद्दपार कार्यवाही तसेच कलम १२९ (ई) भारतीय नागरी सुरक्षा संहीता अंतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने ठाणेदार वर्धा (शहर) यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, ओषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्यावाक्तया प्ररताप मा. वान्मथी सी., जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांना मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने सादर केला होता. सदरहू स्थानबध्द गुंड प्रवृत्तीचा आणि सातत्याने करीत असलेल्या
गुन्ह्यांची मा. वान्मची सी. जिल्हादंडाधिकारी यांनी गांभीयांने दखल घेवून अजित उर्फ अजय उर्फ अजिज उर्फ अज्जु उर्फ तोतल्या बासुदेव राठोड, वय २७ वर्ष, राह. बोरगाव (मेघे) वर्धा याचे विरुध्द दिनांक २४.०२.२०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास जिल्हा कारागृह, भंडारा येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. मागील १ वर्षातील कालावधीमध्ये पोलीस विभाग व महसुल विभाग यांचेमधील योग्य समन्वयामुळे एम. पी.डी.ए. कायद्यान्वये धडक कार्यवाही करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणा-या व्यक्तीवर, तसेच रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये धडकी भरलेली असुन गुन्हेगारी विश्वात पुढचा नंबर कुणाचा लागेल या भितीने चांगलीच दहशत निर्माण झालेली असुन गुन्हेगारांमध्ये चर्चा रंगत असल्याचे दिसुन येते.
आगामी येणारे सण उत्सव व निवडणूक शांतता पूर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणा-या व्यक्तींवर, तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती चान्यची सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक वधर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहेत.
सन २०२५ मध्ये एकुण १८ दारु विक्रते, गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत जैल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२६ वर्षाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत ही चौथी कार्यवाही आहे. अवैध दारु विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती व रेती माफीयांवर कठोर कार्यवाही करण्याचे संकेत मा. पोलीस अधीक्षक, वर्चा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले आहे. मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे बेचडक मोहीमेमुळे अवैध दारु विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती तसेच रेती माफीया मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, उप विभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पोनी/विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा आशिष महेशगीरी, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि./संतोष ताले, मपोहवा वैशाली करमनकर, मपोशि/करिश्मा परचाके पोलीस स्टेशन, वर्धा (शहर) यांनी केली आहे.



