सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारताचे ११वे राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुलकलाम यांची ९५वी जयंती देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल काॅलनी देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना, देऊळगाव राजा,जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी यांचे अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, कैलासराव शेळके, जेष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष प्रा.विनायकराव कुळकर्णी, पुजारी संदीप गरुड होते , सर्वप्रथम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्रा विजय रायमूल, प्रा अशोक डोईफोडे, श्री.शांतिलाल निरफळे, प्रकाश खांडेभराड, प्रा विनायक कुळकर्णी यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला मधुकरराव धुळे, अरुण सपाटे, घनश्यामजी भंडारे,प्रकाश अहिरे, सुशील हनुमंते,आशाताई शेळके तालुका विधी सेवा समितीचे सागर गुजर, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गोविंद बोरकर यांनी केले, राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.



