राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक संघटना, देऊळगाव राजाच्या अध्यक्षपदी प्रा. विनायकराव कुळकर्णी तर सचिवपदी गोविंदराव बोरकर यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम मुंबई तसेच बुलढाणा प्रादेशिक विभाग(विदर्भ)सोबत संलग्न असलेल्या राजमाता जिजाऊ जेष्ठ नागरिक संघटना शाखा देऊळगाव राजा ची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली,
अध्यक्ष पदी प्रा विनायकराव कुळकर्णी यांची तर सचिव पदी गोविंदराव बोरकर यांची एकमताने निवड करण्यात आली, कार्याध्यक्ष म्हणून मधुकरराव शेळके,उपाध्यक्ष पदी मल्लिकार्जुन लंगोटे, व काशिनाथ खांडेभराड, कोषाध्यक्ष म्हणून अरुण सपाटे, तर सदस्य म्हणून बळीराम मापारी, प्रा अशोकराव डोईफोडे, घनश्याम भंडारे, प्रकाश अहिरे, राम चौधरी, रमेश नरोडे, अनिल कुळकर्णी, प्रा विजय रायमूल, रामदास भोलणकर, सतीश कुळकर्णी, सौ आशाताई शेळके यांची निवड करण्यात आली जेष्ठ मार्गदर्शक गोविंदराव अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली,
नवनियुक्त कार्यकारिणी चे स्वागत करण्यात आले असून, जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना कार्य करेल असे अध्यक्ष प्रा विनायकराव कुळकर्णी यांनी सांगितले,



