ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) सप्ताहानिमित्त वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस प्रदर्शनीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिग डे) सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलीस विभागाचे कार्य, जबाबदाऱ्या व सेवा यांची माहिती विद्यार्थी व नागरिकांना मिळावी, या उद्देशाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय, वर्धा येथील परेड प्रांगणात भव्य पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनी दि. ०६.०१.२०२५ ते दि.०७.०१.२०२५ या कालावधीत दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली असून दि. ०६.०१.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या शुभहस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनीमध्ये एकूण १० स्टॉल उभारण्यात आले असून त्यामध्ये वाहतूक शाखा, डायल ११२ विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक, सायबर सेल, शस्त्र प्रदर्शनी, भरोसा सेल, वान पथक, चॉम्ब शोधक व नाशक पथक, बिनतारी संदेश विभाग तसेच न्यायसहाय्यक व अंगुली मुद्रा विभाग यांचा समावेश आहे.

प्रदर्शनीदरम्यान विद्यार्थी व नागरिकांना पोलीस विभागाच्या कामकाजाचाबत सविस्तर माहिती देण्यात येत असून दैनंदिन जीवनात काय करावे व काय करू नये याचाचत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे. सदर प्रदर्शनीस वर्धा शहरातील १२ शाळांमधील अंदाजे १५०० विद्यार्थी, शिक्षकवृंद व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये