ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस कडुन हरविलेले मोबाईल मुळ मालकांना परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताह निमीत्य  दि. ०५.०१.२०२६ रोजी पोलीस मुख्यालय, वर्धा येथील आशिर्वाद हॉल येथे हरविलेले मोबाईल मुळ मालकांना परत करण्याबाबत कार्यक्रम घेण्यात आला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे केवळ संवादाचे साधन नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनले आहे. मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, बंकिंग तपशील, शासकीय कागदपत्रे, फोटो, संपर्क क्रमांक आदी महत्त्वाचा डेटा साठवलेला असल्याने मोबाईल हरवल्यास नागरिकांना आर्थिक नुकसानासह मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन वर्धा पोलीस दलाने हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्याचा उपक्रम राबविला.

या कार्यक्रमात एकूण ९६ हरविलेले मोबाईल फोन अंदाजे कि. ९ लाख ६० हजार रु. चे शोधून त्यांचे मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. सदर मोबाईल फोन मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशीव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले यांच्या शुभहस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले.

सदरची उल्लेखनीय कामगीरीत सहा. पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे, पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, मिना कौरती, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, अंकित जिभे व स्मिता महाजन सर्व नेमणुक सायबर सेल, वर्धा यांचा विशेष सहभाग राहिला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये