स्नेहसंमेलनात भावनांचा आविष्कार
कॉलर्स सर्च अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :_ येथील स्कॉलर्स सर्च अकॅडमी व ज्युनियर कॉलेजचे ‘सृजन २०२६’ हे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार, दिनांक ३ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपनिरीक्षक राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा प्रतिष्ठान कोरपना अध्यक्ष नितीन बावणे , माजी प्राचार्य संजय ठावरी, माजी प्राचार्य दिगंबर खडसे, गणेश गोडे, प्रकाश खनके, प्रभाकर गेडाम,फय्याज सर, माथा सरपंच मंजुषा देवालकर . नारायण झाडे, सावलहिरा सरपंच उमेश पेंदोर, कुंदा झाडे, रेखा बोभाटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राहुल उलमाले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, लोकनृत्य, नाट्य, समूहगीत, देशभक्तीपर गीते तसेच सामाजिक संदेश देणारी सादरीकरणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांचा आत्मविश्वास, शिस्त व कलागुणांचे दर्शन घडले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धात्मक युगात परिश्रम, सातत्य व नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक शिक्षणासोबतच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जेनेकर व डॉ. श्रद्धा पेंदाने यांनी केले, तर आभारप्रदर्शन पूजा थेरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रणाली खडसे, सारिका ढोंगले, उज्वला वडसकर, प्रीती बुटले, नेहा हंसकर, विशाल मालेकर, सचिंद्र जिवतोडे तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



