ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी

चांदा ब्लास्ट

नागभीड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयास आज जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्थापनाचा आढावा घेतला व संबंधितांना सूचना दिल्या. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागभीड येथे सुरू असलेल्या 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी केली. तसेच सार्वजनिक विश्रामगृह इमारत बांधकाम आणि तहसील कार्यालय नागभीडच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामस्थळास भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित कार्यकारी अभियंता व कंत्राटदारांना इमारतींचे बांधकाम गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

तसेच झुडपी जंगल निर्वाणीकरण प्रस्तावाच्या अनुषंगाने नागभीड येथील स्मशानभूमी गट क्रमांक 127/1 व कब्रस्थान गट क्रमांक 71 येथील जागांची पाहणी करण्यात आली. यानंतर तहसील कार्यालयास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनाशी संबंधित विविध कामांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जया कन्नाके, प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत बनपूरकर, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख, उपविभागीय अभियंता गणेश येलेकर, मंडळ अधिकारी शंकर खरुले तसेच ग्राम महसूल अधिकारी नितिन बुच्चे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये