ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री प्रभू रामचंद्र विद्यालय येथे पॉक्सो,सायबर व वाहतूक सुरक्षितता कार्यशाळा आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विद्यार्थी सुरक्षा समिती द्वारा पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा क.महा. नांदा येथे दिं.7 जानेवारी रोजी पास्को, सायबर व वाहतुकीचे नियम यावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव तथा प्राचार्य श्री.डॉ.अनिल मुसळे सर उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून श्री.महेश चव्हाण पोलीस स्टेशन,गडचांदूर व श्री.पराग राजूरकर वाहतूक पोलीस, गडचांदूर यांनी विद्यार्थ्यांना पास्को व सायबर व वाहतुकीचे नियम या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल आणि प्रत्यक्ष जगात मुलांचे संरक्षण सुनिश्चित केल्यासच बालकांवरील लैंगिक गुन्हे रोखता येतील, या मध्ये समाज, पालक, शाळा पोलीस प्रशासन यांची भूमिका महत्वाची ठरते.असे प्रतिपादन श्री मुसळे सर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.निता मुसळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.सचिन बोढाले सर यांनी केले.सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये