नगर परिषद अंतर्गत उज्वल शहर स्तर संघ महिला बचत गटाचा स्तुत्य उपक्रम
मकर संक्रांत निमित्त बचत गट निर्मित वस्तु विक्री स्टॉलचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषद भद्रावती अंतर्गत कार्यान्वित उज्वल शहर स्तर संघ महिला बचत गट यांनी मकर संक्रांत या सणाचे औचित्य साधून स्वयं निर्मित कलात्मक वस्तू विक्री स्टॉल चा आज प्रारंभ करून आत्मनिर्भरते कडे वाटचाल सुरू केली आहे.
शहर स्तरीय संघटन CLF सदस्या अनिता शहा, रंजना मोडक, रूक्साना शेख, प्रिया करमरकर, रेखा कुमरे, ज्योत्स्ना कवासे, तृप्ती हिरादेवे, गीता ठाकरे, रत्नमाला खडसे, मोहना वैरागडे तसेच समूह साधन व्यक्ती CRP च्या योगिता टोंगे, जयश्री भगत, गीता हमदापुरे, कीर्ती लोखंडे, प्रतिभा रायपूरे, पलक धाडसे, मनिषा ढोमणे, संगीता निंबाळकर आदी बचत गट महिलांनी आत्मनिर्भतेचा अंगीकार करीत बचत गटाच्या माध्यमातून विविध उपयुक्त गरजेच्या वस्तू कलात्मक वस्तू, हस्तकलेच्या वस्तू निर्मिती करून मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीस ठेवल्या.
या उज्वल शहर स्तर संघ अंतर्गत शहरात बचत गट उभे करून महिलांमध्ये स्वालंबन,आत्मनिर्भरता, आत्मविश्वास निर्माण करण्यात येते.



