ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छोटूभाई पटेल हायस्कूलचे कलाशिक्षक सुदर्शन बारापात्रे यांची राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेसाठी निवड

नागपूर विभागीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; २३ जानेवारीला परभणी येथे राज्यस्तरीय स्पर्धा

चांदा ब्लास्ट

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या अंतर्गत दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित नागपूर विभागीय शिक्षक पोस्टर स्पर्धेत छोटूभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथील कलाशिक्षक सुदर्शन बारापात्रे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

राज्यस्तरीय शिक्षक पोस्टर स्पर्धा दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, परभणी येथे आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रातील आठही विभागांतील पात्र शिक्षक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतील शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विषयाची मांडणी, कल्पकता तसेच संशोधनात्मक दृष्टिकोन यामुळे सुदर्शन बारापात्रे यांचे पोस्टर परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.

अध्यापनासोबतच सहशालेय उपक्रम, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध शैक्षणिक स्पर्धांचे प्रभावी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले कलाशिक्षक म्हणून सुदर्शन बारापात्रे यांची शैक्षणिक क्षेत्रात विशेष ओळख आहे.

या यशामुळे छोटूभाई पटेल हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजीव मानकर, पर्यवेक्षक श्री. विकास निंबाळकर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुदर्शन बारापात्रे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये