ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोशल मीडिया आवाज युवा पत्रकार महासंघ ग्रुप आर्वी तर्फे पत्रकार दिनाचे आयोजन

पत्रकार दिनानिमित्त विविध कार्याची दखल घेत केला सत्कार सोहळा आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा_ आर्वी येथील शासकीय विश्रामगृह येथे सोशल मीडिया आवाज युवा पत्रकार महासंघ ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्ताने व पत्रकार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी हरीश काळे तहसीलदार आर्वी,विश्वेश्वर पायले प्राचार्य गांधी विद्यालय आर्वी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.विनय देशपांडे,प्रमोद नागरे सहाय्यक शिक्षक व एनसीसी ऑफिसर गांधी विद्यालय आर्वी मान्यवर उपस्थित होते

सर्वप्रथम मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोचे पुजन व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांनी उद्देशून मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यात स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी कैलास कुऱ्हाडे हिने संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती येथुन एम.एस.सी. कम्प्यूटर सायन्यच्या परीक्षेत मेरिटम मध्ये येत प्रथम क्रमांक पटकाविला आहे वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आर्वी येथे झाले असून त्यानंतरचे शिक्षण नगर परिषद माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथुन झाले.

तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.व उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे रुग्णसेवक आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र निस्वार्थ पने सेवा देणारे विक्रम टाक यांचा सत्कार करण्यात आला तसेच पर्यावरणात संरक्षणासाठी सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले कुणाल वानखेडे उर्फ स्नेक दादा आर्वी यांचा सत्कार करण्यात आला तसेच आपल्या वनविभाग क्षेत्रात काम करणारे वनरक्षक शिवाजी सावंत यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

गांधी विद्यालय आर्वीचे प्राचार्य विश्वेश्वर पायले यांचा  सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला दर्पण टोकसे, आनंद श्रीवास, चेतन दाहीर, प्रभू चव्हाण,सुरज मेहरे, साजिद पटेल, अबरार खान,मोहम्मद जमील मनिष वैध,निखील रेवतकर,बाॅबी कुरी, यांची उपस्थिती होती याप्रसंगी सोशल मिडीया आवाज युवा पत्रकार महासंघ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमंग शुक्ला यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये