ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

2 मार्च रोजी जायंटस परिवारातर्फे हास्य कवी संमेलनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरात जायंटस वेल्फेअर फाउंडेशन या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओ ची शाखा असून 1993 पासून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच मरणोत्तर नेत्रदान चळवळीमध्ये या संस्थेचे फार मोठे योगदान आहे शहरातील रसिक प्रेमी साठी सन 1998 पासून दरवर्षी होळी उत्सव सना निमित्ताने मोठ्या प्रमाणात हास्य व्यंग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

सलग 28 व्या वर्षी सुद्धा दिनांक 2 मार्च रोजी शहरवासीयासाठी हास्य व्यंग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हास्य कवी किरण जोशी हे मंच संचलना सोबत हास्याचे फवारे उडणार आहेत.

तर डॉक्टर ममता मेहता, प्रदीप स्वामी, चंद्रेश तुफानी, रवी नावानी, जगदीश यादव, हे कवी सुद्धा हास्यांची धमाल उडउन देणार आहेत या हास्य व्यंग कवी संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन जायंटस परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये