अमर राठोड यांची बांधकाम सभापतीपदी निवड
नगर पंचायत जिवती येथे भाजपची सत्ता असताना रा. काँ. चा सभापती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- मागील सात महिन्यापूर्वी जिवतीच्या नगराध्यक्षा कविता आडे यांच्यावर भाजप मध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस व रा का च्या नगरसेवकानी अविश्वास प्रस्ताव दाखल करून कविता आडे यांना पदावरून हटवून भाजप ने गोंडवाना गणतंत्र पार्टीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली तेव्हा एकही सदस्य संख्या नसताना काँगेसचे चार आणि राष्ट्रवादी कांग्रेस चे तीन अशा सात लोकांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.
परंतु ही सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांनी विषय समितीच्या निवडणुकीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली तोपर्यंत भाजप च्या नगरसेवकाने पक्षाचा गट स्थापन करून गटनेता बनवला नाही त्यामुळे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नोंदणीकृत गटनेते असलेले अमर राठोड यांनी काँग्रेस पक्षाच्या सोबतीने बांधकाम सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा गटनेता अमर राठोड यांची बांधकाम सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.त्याबद्दल नवनिर्वाचित बांधकाम सभापती यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.कविता आडे यांच्यावर अविश्वास दाखल करून फक्त गट स्थापन न केल्याने भाजपला मात्र सभापती पदाला मुकावे लागले आहे.



