आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कोठारी गावात खनीज विकास निधी अंतर्गत 5 कोटी रु. किंमतीचे अंतर्गत सिमेंट रस्ते व बंदिस्त नाली बांधकामाला मंजुरी

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कोठारी गावात खनीज विकास निधी अंतर्गत रु. ५ कोटी किंमतीचे अंतर्गत सिमेंट रस्ते व बंदिस्त नाली बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. आ. मुनगंटीवार यांनी कोठारी वासियांना सदर विकासकामांबाबत दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
कोठारी गावातील छत्रपती चौक (रा. महामार्ग ३५३) ते मारोती बुटले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व बंधिस्त नालीचे व इतर अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे तसेच दिलीप पर्लेवार यांचा घरापासून ते प्रजीमा ४२ व कवडू गुरु (रा. महामार्ग ३५३) ते आंबेडकर चौक व संत गाडगे बाबा चौक ते सचिन शेंडे (प्रजीमा ४२) यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व बंधिस्त नालीचे व इतर अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे या दोन विकास कामांसाठी प्रत्येकी अडीच कोटी याप्रमाणे एकूण पाच कोटी रु निधी मंजूर करण्यात आला आहे.
याआधीही कोठारी गावात आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कोठारी परिसरात पाणी पुरवठा योजना, पोलिस स्टेशन इमारत, व्यायामशाळा, ईटोली-मानोरा-कोठारी-कवडजई या १ कोटी ५५ लक्ष रु. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम, नायब तहसिलदार कार्यालय, संरक्षक भिंत व सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम, जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम, सिमेंट रस्त्यांचे बांधकाम, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम, रविदास महाराज समाजभवनाचे बांधकाम, हनुमान मंदिर फुटके देवस्थान सभागृह आदी विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.
खनीज विकास निधीतून रु. ५ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल सरपंच अश्वीनी वासमवार, उपसरपंच सुनिल फरकडे, संतोष लोनगाडगे, किशोर कोटरंगे, रतन वासनिक, रूपेश वासमवार, जयश्री भोयर, कविता वासमवार, प्रशांत पोटदुखे, वनिता खोब्रागडे, शिला देवाडकर, स्वाती कोडापे, कोमल लाटेलवार, स्नेहल टिंबडीया, आदींनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.



