ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

महाराजस्व समाधान शिबिरातून विविध सेवांचा लाभ : तहसीलदार राजेश भांडारकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १)” अंतर्गत गुरुवार दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालय, भद्रावती येथे शिबिराचे आयोजना संदर्भात पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली. सदर अभियान शासनाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२६ च्या अध्यादेशा नुसार दिनांक ०७ मार्च ते १५ मे २०२६ पर्यंत तालुक्यातील प्रमुख तलाठी साझ्यात आयोजित केले जाणार आहे.

 तहसीलदार राजेश भांडारकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती देत नागरिकांनी शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या प्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. बंडू आकनूरवार, नायब तहसीलदार मनोज आकनूरवार, नायब तहसीलदार मधुकर काळे, नायब तहसीलदार सुधीर खांडरे, क्षेत्र सहाय्यक (वन) विकास शिंदे, दुय्यम निबंधक झाडे, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, भूमी अभिलेख अधिकारी पारधी, देवानंद गावंडे, गट शिक्षणाधिकारी प्रकाश महाकाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिबिरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सेवा व सुविधांची माहिती देताना यामध्ये प्रलंबित जमिनीच्या फेरफार प्रकरणांचा निपटारा, शासकीय अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, अकृषक (एनए) जमिनीबाबत मार्गदर्शन, तसेच गाव दप्तर अद्ययावत करण्याबाबत माहिती देण्यात आली.

यासोबतच ‘ईजी ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत नागरिक सुविधा सुलभ करणे, ई-मोजणी प्रक्रिया गतीमान करणे, कृषी नोंदणी, तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात तक्रार निवारण कक्ष स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल,तसेच भोगवटादार वर्ग बदल, ‘जिवंत ७/१२’ मोहीम, सामाजिक-आर्थिक योजनांचा लाभ, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कामे, जमीन व्यवहार नोंदणी, शालेय दाखले, पांदण रस्त्यांचे प्रश्न आणि ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टे वाटप याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

तालुका पातळीवर असणाऱ्या सर्व विभागवार कार्यालयामार्फत नागरिकांची कोणती कामे सोपी करावी. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

  आयोजित पत्रकार परिषदेत विविध वृत्तपत्राचे पत्रकार दिलीप ठेंगे,प्रा.विवेक सरपटवार,दिलीप मांढरे,लिमेश माणूसमारे, निलेश नवराते, राजू गैनवार,अतुल कोल्हे, श्याम चटपल्लीवार, उमेश कांबळे,महेश निमसटकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये