ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंतामणी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथील मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रजांचा जन्म दिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक मराठी विभाग प्रमुख डॉ. माधव कांडणगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून कवी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा परिचय करून देत मराठी भाषे चा इतिहास सांगत अभिजात मराठी भाषेविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आसुटकर यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे. तिचे जतन आणि संवर्धन आपण केले पाहिजे असे उपस्थिताना सांगत सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमातील प्रमुख अतिथी डॉ. श्रावण बाणासुरे यांनी मराठीची थोरवी आपल्या वाणीतून अत्यंत मार्मिक आणि समर्पक शब्दात वर्णन केली. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राध्यापक, कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश सुरजुसे यांनी केले तर आभार डॉ. नितीन कावडकर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये