महिलांच्या कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक उपक्रम कौतुकास्पद : शिवानी वडेट्टीवार
ब्रम्हपुरीत आ.विजयभाऊ वडेट्टीवार व विजयकिरण फाउंडेशनच्या वतीने गरबा, दांडीया स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- गरबा-दांडिया हा केवळ नृत्याचा उत्सव नसून, भारतीय संस्कृतीचे जतन करणारा आणि महिला व युवतींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी येथे विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि विजयकिरण फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने गरबा-दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवानी वडेट्टीवार बोलत होत्या.
यावेळी मंचावर महीला काॅंग्रेस अध्यक्षा योगिता आमले, कृउबा उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका लता ठाकूर, न.प.सभापती बबीता आमले, माजी नगरसेविका वनिता अलगदेवे, नगरसेविका रेणू ठेंगरी, नगरसेविका जयश्री कुथे, नगरसेविका रंजना बुराडे, नगरसेविका ज्योती राऊत, नगरसेविका पुष्पलता पोपटे, नगरसेविका गीता मेश्राम, नगरसेविका हेमलता सिंहगडे, शहर कार्याध्यक्ष सुधा राऊत, सोशल मीडिया प्रमुख रश्मी पगाडे, महीला काॅंग्रेस सचिव सुशीला सोंडवले, सुष्मा नागमोती, सुनीता पंचवटे, कल्पना तुपट यांची उपस्थिती होती.
शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या की, आजच्या महिला आणि युवती प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. विजयभाऊ वडेट्टीवार आणि विजयकिरण फाउंडेशन यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारी आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःमधील कला सादर करण्याची संधी मिळते, तसेच सांस्कृतिक परंपरांशी असलेली नाळ अधिक घट्ट होते.
स्पर्धेचा प्रथम क्रमांक ३१ हजार रुपये जेन बीट गरबा स्टुडीओ ब्रम्हपुरी, द्वितीय क्रमांक २१ हजार रुपये सखी मंच गरबा गृप ब्रम्हपुरी यांनी तर तृतीय क्रमांक ११ हजार रुपये गोपी बीट गरबा गृप ब्रम्हपुरी यांनी पटकावला.
यावेळी प्रशिक्षक आशिष मुळे, प्रांजली मुंगले, अल्का खोकले, साधना केळझरकर, संगिता राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद व एजाज खान यांनी केले. तर आभार सुधीर पंदीलवार यांनी मानले.



