ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे भव्य तालुकास्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

शिवलिंग स्थापना दिनानिमित्त हनुमान मंदिर देवस्थान खोबरे प्लॉट यांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील खोबरे प्लॉट येथील हनुमान मंदिरात शिवलिंग स्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक १ मार्च ते २ मार्च असे दोन दिवसीय तालुका स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक रोख बक्षीस व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून विविध धार्मिक कार्यक्रमासह शिवलिंग स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे.

दिनांक १ मार्च रोजी सकाळी सात वाजता कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती गवराळा येथील ज्येष्ठ सदस्य व देवस्थान समिती तर्फे ग्रामसफाई, ९. वाजता घटस्थापना आणि १०.००वाजेपासून भजन स्पर्धा प्रारंभ होऊन सायंकाळी गुरुदेव प्रचारक मोझरी रविंद्र कुमार (गुरूजी) लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात येईल.

दिनांक २ मार्च रोजी सकाळी शिवलिंग अभिषेक,८.०० वाजता भव्य शोभायात्रा त्यानंतर हभप सौ. सुवर्णा प्रकाश पिंपळकर यांच्या वाणीतून गोपाळकाल्याचे किर्तन व प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडेल. सायंकाळी विधिवत पूजनाने होलीदहन करण्यात येऊन दिनांक ४ मार्च रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन संपन्न होईल.

अधिकाधिक भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे सुधाकर हनुमंते, दिनेश माशीरकर, प्रवीण झाडे, मारोती झाडे, प्रमोद सोनटक्के, सतीश वरारकर, यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये