ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चला जाऊ या सीमोल्लंघनाला गुगुळा मातेच्या दर्शनाला 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव सालाबदाप्रमाणे दरवर्षी जवळ आला आहे चारशे वर्षाचा मागोवा घेतला तर बरेच बदल झाले आहेत हे लक्षात येईल मंडपोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी दसरा उत्सव असतो त्या दिवशी पांडवांचा वनवास संपल्यामुळे त्यांनी त्यांचे शस्त्र आपटा व शमीच्या वृक्षावर लपवून ठेवले होते ते परत आणण्यासाठी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी विजयाचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी त्या वृक्षावरील शस्त्र परत आणले त्याप्रमाणे देऊळगाव राजा नगरात श्री बालाजींची पालखी रात्री श्रवण नक्षत्रात सिमोलंघणासाठी आमना नदी मार्गाने गावाला प्रदक्षिणा पूर्ण करून दुसऱ्या दिवशी परत मंदिरात येते हा दिवस सर्व गावातील लोकांना मूळ बालाजीच्या मूर्तीला हात लावून दर्शन करण्याची मुभा असते या अगोदर संध्याकाळी गावातील असंख्य तरुण मुले दक्षिण दिशेला टोळी टोळीने जात असत पन्नास वर्षांपूर्वी आमणा नदीच्या पलीकडे जुनी स्मशानभूमी होती त्याच्याही पलीकडे लंकेचा बाग, काळुंका माता दर्शनासाठी जाऊन आपटा व शमीच्या झाडाखाली जाऊन त्या झाडाची पूजा करून आपटा व शमीची पाने सोने चांदी समजून प्रसाद म्हणून सोबत आणत असत जोशी ब्राह्मण त्या झाडाखाली बसलेले असायचे ते आयते तोडलेले पाने देत असत *बोल बालाजी महाराज की जय लक्ष्मी रमण गोविंदा* असे मोठमोठ्याने गर्जना करत नवीन कपडे परिधान करून डोक्याला टोपी कपाळाला लाल तिलक लावून हे सिमोलंघन करीत असत कालांतराने आमना नदिला पाणीच राहिले नाही त्या काळात रात्री बालाजींची पालखी ही नदीत बुडवायचे पुलाखाली खूप पाणी असायचे तिथेही खूप खेळल्या नंतर ओट्यावर ठेवायचे यावेळी श्री तिरुपती बालाजी वाशिम चा बालाजी एकत्र येतात यावर सर्वांचे श्रद्धा असायची तिन्ही बालाजींचे दर्शनाचा लाभ होतो म्हणून अनेक स्त्री पुरुष खूप थंडी असतानाही येत असत त्यावेळेस नदीत वाळू होती नदी पात्र मोकळे होते तिथे कुस्त्याचे आखाडे होत असत बारुद ही मोठ्या प्रमाणात फोडत असत ते पाहण्यासाठी किनगाव राजा, सिंदखेडराजा, वाघरूळ जहागीर लिमखेड, सावखेड तेजन व पंचक्रोशीतील अनेक लोक बैलगाड्या घेऊन हा दसरा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असत नदी पात्राचे वरील भागात सावखेड भोईला धरण झाले नदीचे स्वरूप बदलले आता नदीच्या काठावर आपट्याची पाने जोशी ब्राह्मणाकडून पूजा करून सायंकाळी लोक आणतात पण आता प्रमाण खूप कमी झाले आहे ती परंपरा सिमोलंघनाची सुरू ठेवणे खूप गरजेचे आहे असे सर्वजण मानतात कारण हे आपटा व शमी घेऊन आल्यानंतर सर्वजण बालाजी मंदिरात तेच सोने वाहून दर्शन घेतात देवाला पेढे ,बर्फी वाटतात व घरी गेल्यानंतर घरातील सुवासिनी स्त्रिया सगळ्यांनाच ओवाळतात घरातील देवालाही हे सोने वाहतात व एक मेकाकडे दर्शनाला जाऊन आशीर्वाद मिळवतात मोठ्यांना नमस्कार करून सिमोलंघणाचा खरा आनंद मिळतात हेच पूर्वीचा आनंद परत मिळण्याच्या दृष्टीने काळुंका माता एवजी सीमा ही गावाची वाढल्यामुळे गाड्यांची सोय झाली त्यामुळे व सडका तयार झाल्यामुळे पिंपळनेर मारुती दर्शन सोबतच जवळच्या गीरोली बुद्रुक रस्त्यावर असलेले गुगुला देवी मंदिराचा जिर्नोद्वार झाल्यामुळे जगदंब कृपेने स्थानिक गीरोली निवासी देऊळगावच्या येथील प्राध्यापक स्वर्गीय वसंतराव मुळे हे पिंपळनेर व देवीच्या दर्शनाला रोज जाऊन नियोजित ट्रस्ट स्थापन केले आराखडा तयार करीत दुरुस्त्यासाठी ऑटोकार प्रयत्न करीत असताना प्राध्यापक प्रदीप मीनासे हे गेवराई येथुन सेवा निवृत्त नंतर या श्रीगुगुला देवी संस्थान ट्रस्ट गिरोली बुद्रुक अध्यक्षाचा पदभार 2012 पासून स्वीकारला आहे ही गुगुळा माता अनेकांची कुलदेवता असून चैत्र महिन्यात दरवर्षी पौर्णिमेला हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते या ठिकाणी अद्ययावत खूप सुधारणा झाल्या असून त्यात तीनशे वर्षांपूर्वीचा विटा व चुन्यामध्ये बांधलेल्या दोन दीपमाळा तीनशे वर्षांपूर्वी विटा चुनामध्ये बांधलेली धार्मिक शाळा आजही उत्तम स्थितीत आहेत गुगुळादेवीच्या पायथ्याशी एक मारुतीची दगडी मूर्ती आहे अध्याप या मंदिरावर छत नाही दरवर्षी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात जसे सूर्य महालक्ष्मीचे मुखदर्शन घेत असते त्याप्रमाणे येथेही फेब्रुवारी महिन्यात देवीचे सूर्य मुखदर्शन घेत आहे हे पाहण्यासाठी बरेच लोक हा अदभुत सोहळा पाहण्यासाठी येत असतात येथे शेगावच्या धर्तीवर निष्पृह वृत्तीने तन मन धनाने विश्वस्त मंडळी विकास करीत आहेत त्या ठिकाणी गोरक्षण गोशाळा श्रीकृष्ण गोवर्धन ट्रस्ट गोशाळा या नावाने 2017 सुरू केले आज येथे 100 च्या वर गाईचा सांभाळ केला जातो. गावातून काही दानशूर मंडळी प्रतिमाह हजारो रुपये देऊन गायींच्या चाऱ्यांचा खर्च भागवतात तसेच बालोद्यान, ध्यानमंदिर विद्या तीर्थ, अखंड नंदादीप महोत्सव, बारा गाड्या ओढण्याचा नवस नवरात्रीतील होमवन पाच रंगाची कमल फुले अन्नदान टेकडी वरील गुफा मंदिर नव्याने बांधलेले मंगल कार्यालय पाण्यातील गेम टायर पासून बनवलेले खेळाचे प्रकार प्रेक्षकांचे मन आकर्षित करतात व येथे वनसंपदा खूप मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेते यात शमीची 3 वृक्ष, आपटा (गावरान) एक वृक्ष असल्यामुळे दरवर्षी सिमोलंघणाला प्रत्येक कुटुंबातील लहान मुला मुलींना घेऊन जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण उपलब्ध झाले असून जुनी परंपरा सुरू व्हावी या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व गुगला माता

 म्हणजे महालक्ष्मी विद्यादेवी पूर्वीचे नाव असून परमपूज्य श्री वक्रतुंड महाराज कवीश्वर यांनी शतकापूर्वी 120 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ब्रह्मांड पुराणाच्या मानसोक्तर खंडात देवालय ग्राम महात्मा या संस्कृत ग्रंथातील कथानकात सविस्तर वर्णन केलेले आहे अशा या अतिशय समृद्ध परिसराला सिमोलंघणाचे दिवशी सहकुटुंब सहपरिवार सहित जाऊन अखंड लक्ष्मी व विद्यावंत होण्यासाठी शुभ आशीर्वाद घेऊन पुण्यफळ प्राप्त करू या

जय जगदंबा……….

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये