ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सत्र उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षण सत्रात प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून श्री. सूरज टोगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय गाडगे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा. दिनकर झाडे उपस्थित होते.

आपत्तीच्या काळात घ्यावयाची खबरदारी, आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याची आवश्यकता याविषयी या प्रशिक्षण सत्रातून मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आपत्तीविषयक जागरूकता निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी होण्यास मदत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल मेहरकुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राजेश बोळे यांनी केले. प्रशिक्षण सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अशोक सातारकर, प्रा. नितीन सुरपाम, कु. गहुकर मॅडम आणि कु. निखाडे मॅडम यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये