बालाजी महाराज मंदिरात मंडपोत्सव… ला प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगावराजा येथील बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवाची सुरवात नवरात्रीत घटस्थापने पासून होते.. त्यातील आज दि.19/ 10/2026 रोज सोमवारला मंडोपत्सव आहे … जाणून घेवूया आमच्या ग्रामदेवतेचा इतिहास …
छ.संभाजीनगर येथून ८५ कि. मी. अंतरावर असलेले एतिहासीक देऊळगावराजा येथील श्री बालाजी मंदिर हे प्रती-तिरुपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या येथील नवरात्रौत्सवास ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे…*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचे काका, राजे जगदेवराव जाधव, दरवर्षी तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात असत. एके वर्षी ते दर्शनाला जाऊ शकले नाही, परंतु त्यांच्या अपार श्रद्धेपोटी श्री बालाजींचा त्यांना साक्षात्कार झाला व त्यांना गोदावरी नदीच्या पात्रात बालाजीची धातूची मूर्ती सापडली.
असे म्हंटले जाते कि, नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी गिरी पर्वतावर ध्यान धारणा करत असतात. याच काळात राजे जगदेवराव यांना श्री. बालाजी महाराजांनी दर्शन दिले. बालाजींच्या साक्षात्कारानुसार, राजे जगदेवराव जाधवांनी देऊळगावराजा येथे श्री व्यंकटेश अर्थात बालाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तेथे सर्वांग सुंदर असे मंदिर बांधले.*
बालाजींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा उत्सव, ३३८ वर्षांपूर्वी म्हणजे १६८५ साली नवरात्रातील दहा दिवस चालला. घटस्थापना, लाटामंडप उत्सव, लळित उत्सव, असे त्याचे स्वरूप होते. नवरात्राच्या काळात राजे येथे मुक्कामास असत. आजही त्यांचे वंशज राजे विजयसिंगजी जाधव याच पद्धतीने नवरात्रात हे उत्सव साजरे करतात… यात संपूर्ण नगरीतील सर्व जाती धर्मातील नागरीकांना काही ना काही जबाबदारी दिलेली असते . . . उदा. सुतार – लोहार समाजास लाटांची दुरुस्ती तथा पालखीची जडण घडणी सह दुरुस्ती करणे … माळी समाजास लाटा मंडपास लागणरे दोर बनविणे … न्हावी समाजास यात्रोत्सव काळात मंदीरात चौऱ्या ढाळणे. . . मुस्लिम समाजास नगारा वाजवणे … असे सर्वच अठरा पगड समाजास या उत्सवात काही ना काही सेवा करण्याची संधी दिलेली असते . . . सर्व नगरवासी पण ही कामे मोठ्या श्रध्देनी व आनंदाने करतात . . . या सेवेपोटी संस्थान कडून सर्व जाती धर्मास प्रसाद म्हणून श्रीफळ व केळी दिली जाते . . . त्याला वंश परंपरागत राजांचा सन्मान असे ही म्हणतात . . .*
कोल्हापूर निवासी, महालक्ष्मी देवीच्या आज्ञेवरून, करवीरचे कण्वशास्त्रीय देवशर्मा यांनी देऊळगावराजा येथील श्री बालाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका आहे.*
त्याचप्रमाणे. श्री. बालाजी तिरुपतीला रहातात, वाशीम येथे जेवण करण्यास जातात तर देऊळगावराजा येथे व्यापार करण्यासाठी येतात, असाही समज आहे.*
तिरुपती येथील बालाजी मंदिर अश्विन शुद्ध दशमी ते अश्विन वद्य चतुर्थी दरम्यान बंद असते, आणि नेमक्या याच वेळी देऊळगावराजा येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात साक्षात श्री, तिरुपती बालाजीचे वास्तव्य देऊळगावराजा येथे असते अशी नगर वाशीयांची श्रद्धा आहे .*
देऊळगावराजा येथील श्री बालाजींचे मंदिर १०५ फूट लांब व ८० फूट रुंद तर ५० फुट उंच आहे. मंदिरात श्री बालाजींची पंच धातूची मूर्ती सोन्या-चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे.*
श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी देऊळगावराजा येथील श्री बालाजींना सोन्या-चांदीची आभूषणे अर्पण केली होती. आजही ती आभूषणे बालाजींच्या मूर्तीवर यात्रोत्सवात चढविली जातात.*
घटस्थापने पासून रोज सकाळी सुर्योदयापूर्वी काकडा आरती …अष्टमीच्या दिवशी लाटा मंडप उत्सव होतो. तर दशमीस बालाजी महाराज पालखीत बसून नगराची परिक्रमा सिमोल्लंघनाने करतात . . . या दिवसी महाराजाच्या मुर्तिस प्रत्यक्ष हात लावून दर्शन घेण्यासाठी भावीकांची रिघ लागते . . .*
आज यापैकी मंडोपत्सव आहे . . . या उत्सवात एकवीस सागवानी, ३० फुट उंच लाटांवर (खांब) ४२ मंडप जाड नाड्याने बांधून उभारला जातो. यात सर्व नगर वाशी मंडप उभारणीसाठी हातभार लावतात . . . या उत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो . . . हा लाटा मंडप १० दिवस कायम उभा असतो. समाप्तीला लाटा काढून घेऊन लळित उत्सव साजरा केला जातो. याच लळीतास श्री बालाजी व श्री देवी यांचा नयनरम्य अनुपम्य विवाह सोहोळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. पेशव्यांच्या काळापासून या उत्सवात कुठलाही बदल झालेला नाही.*



