ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहर परिसरातील मोटर सायकल चोरणारा चोरटा गजाआड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सदर गुन्हयाची हकीकत या प्रमाने आहे की, नमुद घटना ता वेळी व स्थळी यातील फिर्यादी नामे किशोर तुळसिदास वाघेला वय 36 वर्षे रा. गजानन नगर वर्धा यांचे दिनांक 03/02/2026 10/00 बा. ते 10/30 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने शिवाजी चौक वर्धा ते गोंड प्लॉट कडे जाणारे रोडवरुन एक हीरो कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल क्र. MH-32-AR-9088 किं 50000/रु ची चोरुन नेली आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. वर्धा शहर येथे अप.क्र.0116/2026 कलम 302 (2) भा.न्या.सं. अन्वये नोंद करुन तपासावर आहे.

सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबिर कडुन खात्रीशिर मिळालेल्या माहीती वरुन दिनांक 26/02/2026 रोजी अज्ञात आरोपी नामे अमोल अशोकराव पांडे वय 39 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर नगर म्हसाळा वर्धा याचे ताब्यातुन गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली 1) एक हीरो कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल क्र. MH-32-AR-9088 किं 50,000/रु जप्त करण्यात आली असुन तसेच वर्धा शहर परीसरातुन चोरलेले 2) एक स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची बिना नंबरची जिचा चेचीस क्र. 06L16F50718 असे असून इंजन क्र. 06L15E60189 असे असलेले किं. 35,000/रु 3) एक हीरो कंनीची काळ्या रंगाची HF डीलक्स क्र MH-32-AG-2189 किं. 55,000/रु रु 4) एक होंडा कंनीची DIO मोपेड गाडी MH-32-Y-6831 किं, 30,000/रु 5) एक होंडा कंनीची अॅक्टीव्हा मोपेड पांड्या रंगाची बिना नंबर प्लेटची जिचा चेचीस क्र. ME4JF505JGU394882 किं. 25,000/रु असा एकुन जुमला किंमत 1.95.000/ रुपयाचा जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस केला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर सा. तसेच पो.नि. संतोष टाले सा., यांचे निर्देशनानुसार पो.स्टे.वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोउपनी शरद गायकवाड सा. पो.हवा. राजेश राठोड ब.क्र. 879, पो.हवा. लोभेश गाढवे ब.नं. 476, सुरज जाधव ब.क्र. 1586, चेतन दुबे ब.क्र. 205 यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये