ज्येष्ठ नागरिक समाजाचे प्रेरणास्थान : _एस.डी.एम. आकाश वर्मा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ समाजात जेष्ठ नागरिक हे नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान असून त्यांनी सातत्याने आपले अनुभव शेअर करत राहावे. त्यामुळे सुजाण, समृद्ध पिढी निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गोंडपिपरीचे उपविभागीय दंडाधिकारी परिवीक्षाधीन आय. ए. एस. अधिकारी आकाश वर्मा यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ गोंडपिपरी तालुका व तहसील कार्यालय गोंडपिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओळखपत्र वाटप व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला तहसीलदार शुभम बाहकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश राव चौधरी, बबनराव पत्तीवार धाबा, वैद्यकीय अधिकारी डॉ. पिल्लेवान, डॉ. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पीपीटी प्रेझेंटेशन च्या माध्यमातून एलईडी स्क्रीनवर तहसीलदार शुभम बाहकर यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा व तरतुदी समजावून सांगितल्या. डॉ. पिल्लेवान व डॉ. गायकवाड यांनी वृद्धाप काळात घ्यायची काळजी यावर मार्गदर्शन केले.
या वेळी ६९ वृद्धांना शासकीय ओळखपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेशराव चौधरी यांनी ज्येष्ठांच्या प्रमुख मागण्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या. बबनराव पत्तीवार यांनी ज्येष्ठांतर्फे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी सुरेश वायकोर, केशव खेवले, उमाकांत खेवले, मुरलीधर भोयर, राजू बट्टे, राजू चंदेल, योगेश गुडपल्ले, वाघ मामा, पोटवार सर, बाळकृष्ण पुलगमकर, प्रकाश काळे, बळवंत भोयर, पुणेकर सर, खेकारे, तुकेश वानोळे, कन्नाके, देवाजी पुलगमकर व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



