गुरुकुल महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यारपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदाचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी भूषविले. या कार्यक्रमाला गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. प्रशांत पुराणिक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रा. आशिष पैनकर, ग्रंथालय विभागाचे प्रा. सचिन कर्णेवार यांची देखील उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा.
सावरकर यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील अत्यंत महत्त्वाच्या योगदानावर प्रकाश टाकला. वि. दा. सावरकर हे असे एकमेव क्रांतीकारक आहेत ज्यांना १९११ मध्ये दुहेरी जन्मठेपेची म्हणजेच एकूण पन्नास वर्षाची दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली होती, असे मत डॉ. अनिल मुसळे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात मांडले. यापूर्वी झालेल्या भाषणांमध्ये गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून वि. दा. सावरकर यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या विविध कार्याची माहिती दिली. ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. आशिष पैनकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, प्रशांत नवले, शालिक कांबळे, सविन मडावी, ननीता बुऱ्हाण या सर्वांनी परिश्रम घेतले.



