ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जलतारा प्रकल्पाने पाणी पातळी वाढली : शेतकऱ्यांनी घ्यावा आदर्श

मा.जि.प.सदस्य श्री. रामराव चव्हाण यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पुसद : हरीतक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक व जलक्रांतीचे जनक सुधाकर नाईक यांच्या पुसद तालुक्यातील घानोरा (सिंगारवाडी ) या गावातील प्रयोगशिल शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी जि.प. सदस्य,यवतमाळ यांनी आपले सेत सव्हें नं . 247 मध्ये 20 फूट व्यास आणि 50 फूट खोल विहीर खोदली असून पाण्याची पातळी वाढण्यासाठी कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी श्री.बिजवल साहेबांच्या मार्गदर्शनानुसार विहीरीच्या वरच्या बाजूला उताराला जलतारा प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 5 फूट लांब 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल शोषखड्डा तयार करून अर्धा खड्डा दगड गोटयांनी भरून घेतला व उर्वरीत भाग मातीने भरून घेतला, अतिशय अल्पावधीत अनेक कर्मचाऱ्यासमवेत गेल्यावर्षी बैठक घेतली व कर्मचाऱ्यासमेत पाणी पातळीची वाढ, दूध उत्पादन वाढीवर भर देणारी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले त्यामुळे या वर्षीच्या पाणी टंचाईच्या काळात सुद्धा आजूबाजूच्या शेतक -यांच्या मोटारी तीन घंटयात विहीर खाली करते.

शेजारी शेतकरी बाबुलाल रामू चव्हाण यांच्या विहीरीचे पाणी 15 ते 20 फूट खोल असून 3 ते 4 तासातच विहीर पूर्णपणे खाली होते तर जलतारा प्रयोगाच्या योग्य ठिकाणी केवळ 3 शोषखड्डे केल्यामुळे रामराव चव्हाण यांची 5 ची मोटार दिवसभर चालूनही 2 ते 3 फूट पाणी खाली जाते.भूगर्भातील पाणी पातळी वाढली असून शेतकऱ्यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शेतात असे शोषखड्डे मोठ्या प्रमाणात केल्यास पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फायदेशिर ठरू शकते, सोबत दोन्ही शेतकऱ्यांच्या पाणी पातळी दर्शविणारे छायाचित्र दिले आहे.आमच्या प्रत्यक्ष प्रयोग आणि अनुभवाच्या आधारे जाहीर विनंती करण्यात येते की,सर्व ग्रां.पं.आणि शासकीय यंत्रणा याकामावर विशेष भर दिल्यास दुष्काळी परिस्थीतीवर मात करता येते.रोजगार हमी योजनेतही उत्पादक कामावर भर देण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत,गरज आहे त्याची काटेकोर अमलबजावणी करण्याची असे प्रतिपादन रामराव चव्हाण यांनी केले आहे. श्री.बिजवल साहेबांच्या मार्गदर्शनानुसार विहीरीच्या वरच्या बाजूला उताराला जलतारा प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 5 फूट लांब 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल शोषखड्डा तयार करून अर्धा खड्डा दगड गोटयांनी भरून घेतला व उर्वरीत भाग मातीने भरून घेतला,अतिशय अल्पावधीत अनेक कर्मचाऱ्यासमवेत गेल्यावर्षी बैठक घेतली व कर्मचाऱ्यासमेत पाणी पातळीची वाढ,दूध उत्पादन वाढीवर भर देणारी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले त्यामुळे या वर्षीच्या पाणी टंचाईच्या काळात सुद्धा आजूबाजूच्या शेतक-यांच्या मोटारी तीन घंटयात विहीर खाली करते. शेजारी शेतकरी बाबुलाल रामू चव्हाण यांच्या विहीरीचे पाणी 15 ते 20 फूट खोल असून 3 ते 4 तासातच विहीर पूर्णपणे खाली होते तर जलतारा प्रयोगाच्या योग्य ठिकाणी केवळ 3 शोषखड्डे केल्यामुळे रामराव हूपसिंग चव्हाण यांची 5 ची मोटार दिवसभर चालूनही 2 ते 3 फूट पाणी खाली जाते.भूगर्भातील पाणी पातळी वाढली असून शेतकऱ्यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शेतात असे शोषखड्डे मोठ्या प्रमाणात केल्यास पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फायदेशिर ठरू शकते, सोबत दोन्ही शेतकऱ्यांच्या पाणी पातळी दर्शविणारे छायाचित्र दिले आहे.आमच्या प्रत्यक्ष प्रयोग आणि अनुभवाच्या आधारे जाहीर विनंती करण्यात येते की,सर्व ग्रां.पं.आणि शासकीय यंत्रणा याकामावर विशेष भर दिल्यास दुष्काळी परिस्थीतीवर मात करता येते. नवे प्रयोग समजून घेण्याच्या उत्सुकूतेपोटी शेतकऱ्यांसह वसंतराव नाईक परसबाग नागपूरलाही त्यांनी अभ्यास दौरा नेला होता.रोजगार हमी योजनेतही उत्पादक कामावर भर देण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत,गरज आहे.

काटेकोर अमलबजावणी करण्याची असे प्रतिपादन रामराव चव्हाण यांनी केले आहे.रामराव हुपसिंग चव्हाण यांच्या प्रयोगाला अभियानाचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी शासनस्तरावर मोहीम हाती घेतली पाहीजे असा मनोदय ज्ञान प्रकाशचे श्रीपत राठोड,नागपूर यांनाही व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये