युवाशक्ती हिच आमची खरी ताकद _आमदार देवराव भोंगळे
युवा उद्योजक चिराग सांगानी यांचा भाजपात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ भाजपला देशभरात जे यश मिळत आहे. त्यात युवकांचा मोठा वाटा आहे. युवाशक्तीची ताकद आमच्यासोबत आहे. त्यांच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
गोंडपिपरी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुक प्रचारार्थ झालेल्या कार्यक्रमात गोंडपिपरी येथील युवा उधोजक चिराग सांगानी यांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते.
चिराग सांगानी हे भाजपचे जेष्ठ दिवंगत नेते नरेश सांगानी यांचे सुपुत्र आहेत. प्रवेशानंतर भाजपला युवाशक्तीच्या माध्यमातून अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी चिराग सांगानी यांनी दिली.
याप्रसंगी भाजपाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प.सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, महामंत्री निलेश संगमवार,भाजयुमो चे तालुकाध्यक्ष राकेश पून, निलेश पुलगमकर, भानेश येग्गेवार, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे,नगरसेवक अनिल झाडे,गणेश मेरूगवार, जेष्ठ नेते बबन निकोडे, दीपक बोनगीरवार, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, राकेश साखलवार, प्रवीण धोडरे, वैभव बोनगिरवार, शिथिल लोणारे, सचिन चिंतावार, उपनगराध्यक्ष सारिका मडावी यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या कुशल नेतृत्वाने अनेक युवा प्रोत्साहित होत आहेत. गोंडपिपरी येथील युवा उधोजक चिराग सांगानी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यापुढेही अनेक युवा भाजपा पक्षात येण्याची शक्यता आहे.
*राकेश पूण, भाजयुमो तालुकाध्यक्ष, गोंडपिपरी*



