ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चेकपिपरी शिवारात वाघाच्या “एंट्रीने” खळबळ

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ; रात्री शेतात जाणे टाळण्याचे वनविभागाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ मध्यचांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात सध्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अशातच शनिवारी (दि. 24) पहाटे चेकपिपरी शिवारात वाघाच्या पगमार्कने गावकऱ्यांची झोप उडवली. गतवर्षी चेकपिपरी आणि गणेशपिपरी गावात वाघाने धुमाकूळ माजवला होता. असे असताना आता पुन्हा चेकपिपरी शिवारात वाघाच्या एन्ट्रीने खडबड उडाली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी गावात मंगेश खरबनकार यांच्या शेतात शनिवारी वाघाचे पगमार्क आढळले. यामुळे खळबळ उडाली. शेतातील पगमार्क कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चेकपिपरी शेतशिवारात काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर आहे.

परिसरात वाघाचे पगमार्क आढळून आले. शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटे तसेच सायंकाळनंतर जावे लागते. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री एकट्याने शेतात जाणे धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर धाबा वनपरिक्षेत्रातील वनविभागाने तातडीने घटनास्थळ गाठून पगमार्कची पाहणी करावी, कॅमेरा ट्रॅप लावून वाघाच्या हालचालींचा मागोवा घ्यावा,अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला माहिती द्यावी, रात्री शेतात एकट्याने जाणे टाळावे, समूहाने प्रकाशाची साधने सोबत घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे. वाघाचा वावर असल्यास गोंधळ न घालता सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे, वनविभागाच्या पाहणीत या पगमार्कचे स्वरूप आणि वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी चेकपिपरी आणि गणेशपिपरी येथील इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यामुळे सद्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत, या परिसरात वाघाचे पगमार्क आढळून आले असून, शेतकऱ्यांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्रधिकारी किशोर गौरकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये