ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन तथा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भद्रावती यांच्या वतीने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी शस्त्रपूजन तथा विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शहरातून शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. उत्सवात संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला ह. भ. प. भुजंगराव खानोरकर आणि मा. तालुका संघचालक श्री विवेकजी फाळके यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अनंतजी डेहनकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पथसंचलनाचा प्रारंभ लोकमान्य विद्यालय येथून करण्यात आला. त्यानंतर गांधी चौक, नगर परिषद, शिंदे कॉलेजसमोरून मार्गक्रमण करीत पथसंचलन पुन्हा लोकमान्य विद्यालय येथे येऊन पोहोचले. या पथसंचलनातून शिस्तबद्ध संचलन आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडले.

विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती आणि प्रमुख वक्ते यांच्या मार्गदर्शनातून विजयादशमीचे महत्त्व तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याविषयी विचार मांडण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भद्रावती यांच्या वतीने आयोजित शस्त्रपूजन तथा विजयादशमी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये