ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायवन येथे अवैध देशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चहा दुकानातून १,९२० रुपयांची देशी दारू जप्त : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तालुक्यातील सायवन फाटा बसस्थानक परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत चहा दुकानातून रॉकेट संत्रा देशी दारूच्या ४८ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत १ हजार ९२० रुपये असून, याप्रकरणी संजय पुरुषोत्तम अलोने (वय ५२, रा. सायवन, ता. भद्रावती) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुभाष नथ्थुजी गोहोकार व त्यांच्या पथकातील कर्मचारी भद्रावती परिसरात गस्त घालत होते. यावेळी सायवन फाटा बसस्थानकाजवळील चहा दुकानात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत संबंधित दुकानाची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत चहा दुकानाच्या ओट्याखाली लाल कापडी पिशवीत रॉकेट संत्रा देशी दारूच्या प्रत्येकी ९० मिली क्षमतेच्या ४८ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी ४० रुपये किमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत १ हजार ९२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. विक्रीच्या उद्देशाने दारू बाळगल्याचा संशय आल्याने हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये