निंबाळा येथे स्वच्छता पंधरवाडा अभियानांतर्गत जनजागृती
युवकांना स्वच्छतेचे महत्व व सामाजिक जबाबदारीचे मार्गदर्शन : संजय ढवस व देवा पाचभाई यांची सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मेरा युवा भारत, चंद्रपूर यांच्या स्वच्छता पंधरवाडा अभियानाच्या अनुषंगाने निंबाळा (घोट) येथे युवकांशी संवाद साधून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
धनोजे कुणबी सेंट्रल कमिटीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी व्यापारी व उद्योजक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय भाऊ ढवस यांनी देवा भाऊ पाचभाई यांच्यासह निंबाळा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील युवकांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. युवकांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करावे आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
‘युवाशक्तीचा निर्धार, स्वच्छ सुंदर भारत साकार’ हा संदेश देत युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी आकाश ढवस, विजय नेहारे, निनाद कुतमारे, पियुष राऊत, योगेश ढवस, गोलू जांबुळे, विशाल कोडापे, चेतन राऊत, विशाल राऊत, श्रेयश कोडापे, सुमित जीवतोडे, भाविक कुत्तरमारे, धीरज कोडापे, योगेश नेहारे, शंकर पुलके, गौरव राऊत, स्वप्नील ढेंगळे, ओम सोनटक्के, सोहम डाहुले, राजू तांदूळकर, दिव्यांशु राऊत, सतीश नागोसे आणि कैलाश दुधकोळे यांच्यासह गावातील युवक उपस्थित होते.



