ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ४१ देखरेख पथके कार्यरत

चांदा blasfb

  चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत ४१ विविध देखरेख पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत.

   निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, तसेच बेकायदेशीर प्रचार, रोख रक्कम, मद्य, भेटवस्तू वितरण यांस प्रतिबंध घालण्यासाठी सकाळी ८ व संध्याकाळी ८ अशा एकूण १६ स्थायी निगराणी पथके (Static Surveillance Team – SST) नियुक्त करण्यात आली आहेत.

  तसेच तक्रार प्राप्त होताच तत्काळ कारवाई करण्यासाठी सकाळी ५ व संध्याकाळी ५ अशी एकूण १० फिरती पथके (Flying Squad) कार्यरत असून, प्रचार सभा, मिरवणुका व इतर निवडणूक कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासाठी सकाळी ५ व संध्याकाळी ५ अशी एकूण १० व्हिडिओ देखरेख पथके (Video Surveillance Team – VST) कार्यरत आहेत.

   या व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या चित्रफितींचे परीक्षण करून आचारसंहिता उल्लंघनाची प्रकरणे निष्पन्न करण्यासाठी ५ व्हिडिओ परीक्षण पथके (Video Viewing Team – VVT) कार्यरत ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे निवडणूक आचारसंहिता उल्लंघन निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित पथक किंवा निवडणूक प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये