ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा व अन्य सामाजिक संघटनाव्दारे स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट

भारतीय स्वातंत्र्य समरातील धगधगते अग्निकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी चंद्रपूर महानगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे भाजपा, स्वातंत्र्यवीर सावरकर मंच व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.

पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हसंराज अहीर यांच्या मार्गदर्शनात सावरकर चौक परिसरातील सावरकरांच्या स्मृतीस्थळावर पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ अशोक जिवतोडे, भाजपा नेते खुशाल बोंडे, कमल स्पोर्टींग क्लब चे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, तुषार सोम, सावरकर मंच चे रविंद्र येनारकर, बलराम डोडाणी, रविंद्र गुरनुले, राजेंद्र खांडेकर, गिरिष अणे, राजू घरोटे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करुन त्यांच्या स्मृतीस उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी डाॅ अशोक जिवतोडे यांनी सावरकरांनी मातृभुमीसाठी काळ्या पाण्याची शिक्षा तर भोगलीच परंतु भारतीयांच्या मनामनामध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आपल्या धारदार लेखणीतून स्वातंत्र्य लढ्याला नवे आयाम देवून लोकांमध्ये प्रेरणा प्रसवली. त्यांचे योगदान अभुतपूर्व असून त्यांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. रघुवीर अहीर यांनी आपल्या मार्गदर्शनात सावरकरांच्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील त्याग व कार्याचा गौरवपूर्ण शब्दांमध्ये परिचय करुन दिला.यावेळी खुशाल बोंडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वा. सावरकर यांच्या जिवनपटलावर प्रकाष टाकला..

या कार्यक्रमास स्वा. सावरकर विचार मंच चे राजुभाऊ वेलंकीवार, प्रकाश आवळे, संजय जोशी, सुरेश जुमडे, दिनकर सोमलकर, देवानंद वाढई, राजू अडपेवार, पुनम तिवारी, स्वप्नील डुकरे, रवी लोनकर, प्रमोद शास्त्रकार , शीतल गुरनुले, पुश्पा उराडे, सरला कुळसंगे, आषा देषमुख, प्रज्ञा बोरगमवार, शालू कन्नोजवार, मधुकर राऊत, प्रदिप किरमे, श्रीकांत भोयर, संजय खनके, तुषार मोहुर्ले, विष्वजित शाह , चंदन पाल, नकुल आचार्य, सचिन संदुरकर, कमल कजलिवाले, कपिष उजगांवकर, रोहीत खेडेकर, प्रा. महेष यार्डी, यांचेसह अनेक सावरकर प्रेमींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वा. सावरकर विचार मंच चे रविंद्र येनारकर यांनी केले. संचालन विकास खटी यांनी केले तर उपस्थितांचे आभार मयुर भोकरे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये