अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस अत्यंत शिताफीने ताब्यात
पिडीत मुलीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विवरण याप्रमाणे आहे की यातील फिर्यादीने पोलीस स्टेशन देवळी येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 17 वर्षे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले. अशा दि 17/10/2025 ला फिर्यादीच्या दिलेल्या रिपोर्ट वरून पो. स्टे. देवळी येथे अप क्र.800/2025 कलम 137(2), BNS प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले.
सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून व तांत्रिक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपीची व पीडित मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असता आरोपी व पीडित मुलगी हे शिर्डी जि. अहिल्यानगर येथून रेल्वेने वर्धेकरता येत असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने रेल्वे स्टेशन वर्धा येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन आरोपी समीर कैलास बावणे वय 24 वर्ष रा.देवळी यास सदर गुन्ह्यात रीतसर कायद्याप्रमाणे अटक करून गुन्हातील अल्पवयीन पीडित मुलगी वय 17 वर्षे हिला तिचे पालकांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पो. स्टे. देवळी करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमल, खुशालपंत राठोड, नितेश मेश्राम, म.पो.हवा. अलका कुभंलवार, पो.शि. नवनाथ मुंडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तसेच सायबर सेल येथील अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.



