ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे सर्जनशीलतेचा उत्सव

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे नर्सरी व एल.के.जी. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व यु.के.जी. विद्यार्थ्यांसाठी शब्द निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. या दुहेरी उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लहान वयातच मुलांमध्ये दडलेले कलागुण आणि बौद्धिक क्षमता ओळखणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. चित्रकला स्पर्धेमुळे सर्जनशीलता, एकाग्रता यांचा विकास होतो. तर शब्द निर्मिती स्पर्धेमुळे शब्दसंग्रह, भाषिक विकास आणि विचारक्षमतेचा विकास होतो. शालेय जीवनात अशा स्पर्धांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देता येते व त्यांच्या आत्मविश्वासातही लक्षणीय वाढ होते.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांमधील प्रत्येक सुप्त गुण ओळखून त्याला योग्य व्यासपीठ देणे हेच आमचे लक्ष आहे. असे वक्तव्य केले. तर शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी ‘स्पर्धा‘ म्हणजे केवळ जिंकणे नव्हे तर शिकण्याची आणि स्वतःला घडवण्याची संधी आहे असे म्हणत स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा आमच्यासाठी विजेता आहे असे म्हटले.

ही स्पर्धा पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम प्रभारी सौ. योगिता देवतळे व सर्व शिक्षकांनी आपले मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये