भद्रावतीत महसूल समाधान शिबीर अभियानासाठी २७ फेब्रुवारीला बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. 1) प्रभावीपणे राबविण्यासाठी भद्रावती तालुक्यात तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय भद्रावती येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदर अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच या शिबिरांद्वारे जनजागृती आणि प्रचार-प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.
तहसिलदार राजेश भांडारकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या बैठकीस भद्रावती पत्रकार संघ यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून अभियानाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविता येईल.



