भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चंद्रपूरात तीन सभा
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर कार्यालयाचे उद्घाटन, घरपट्टे मिळालेल्या नागरिकांकडून सत्कार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व महायुतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज, बुधवार दिनांक ७ जानेवारी रोजी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रपूर दौऱ्यावर येत असून शहरातील विविध ठिकाणी तीन जाहीर सभा घेणार आहेत. तसेच कायमस्वरूपी घरपट्टे मिळालेल्या नागरिकांकडून घुटकाळा येथे त्यांचे स्वागत, सत्कार आणि आभार व्यक्त करण्यात येणार आहे. याशिवाय गांधी चौकातील भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता चंद्रपूरात त्यांचे आगमन होणार आहे. १०.३० वाजता जटपूरा गेटजवळील सपना टॉकीज परिसरात ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ११.१५ वाजता घुटकाळा येथे कायमस्वरूपी घरपट्टे मिळालेल्या नागरिकांकडून त्यांचा सत्कार व आभार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १२ वाजता गांधी चौक येथील भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पुढे १२.४५ वाजता सिद्धार्थ नगर बाबूपेठ आणि १.३० वाजता इंदिरा नगर येथील राधाकृष्ण चौक येथे जाहीर सभांना ते संबोधित करणार आहेत.
या सर्व सभांना भारतीय जनता पार्टीतील सर्व नेते उपस्थित राहणार असून, नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने करण्यात आले आहे.



