डॉ. गोपाल मुंदडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजली कार्यक्रम

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष स्व. डॉ. गोपाल मुंदडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. तुकूम परिसरातील महेश भवन येथे सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. स्व. डॉ. गोपाल मुंदडा यांनी आयुष्यभर सामाजिक कार्यातून अनेकांना आधार दिला आहे.
वैद्यकीय व्यवसायातून अनेकांना जीवनदान दिले असून, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराने या श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



