राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रभाकर नवघरे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे १९ वे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा व ग्रामस्थांच्या मदतीने सांगडी मंडल- बेला जि. आदिलाबाद येथे येत्या ६ व ७ मार्च २०२५ ला होत आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रभाकर किसनराव नवघरे (सांगडी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
प्रभाकर नवघरे हे व्यवसायाने प्रगतीशील शेतकरी असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे निस्सीम उपासक आहे.ते डॉ.मोती महाराज श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाचे सक्रिय सदस्य आहेत. तसेच भजन सेवेच्या माध्यमातून ते सदैव राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार व प्रसार करीत असतात. दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य संमेलनाची नियमित वारकरी आहे.
केंद्रीय समितीची व स्थानिक आयोजन समितीची नुकतीच सांगडी येथे सभा संपन्न झाली, त्यात त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या संमेलनात स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, सामुदायिक ध्यान व प्रार्थना, प्रबोधन संध्या, संमेलनाध्यक्षाची प्रकट मुलाखत, योग निसर्गोपचार मार्गदर्शन, समारोपीय कार्यक्रम, कीर्तन आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
स्वागताध्यक्ष नवघरे यांचे केंद्रीय समितीचे इंजि. विलास उगे, श्रीकांत धोटे, संजय वैद्य, देवराव कोंडेकर, भाऊ पत्रे, महेंद्र दोनोडे, हरिश्चंद्र बोढे, लटारू मत्ते, संजय तीळसमृतकर, शिवाजी भेदोडकर, जानकराव नवघरे, सुनील भोयर, श्रीधर पाटील भेदोडकर, सुधाकर भेदोडकर, नरसिंगू कोपूलवार, अशोक पाटील भैरवार, नानाजी मालेकर, महेंद्रजी जिट्टावार, प्रभाकर एडपेल्लीवार, भुमा रेड्डी एल्टीवार, दयाकर रेड्डी नल्लावार, मधुकर पाटील भेदोडकर, रवींद्र पाटील भेदोडकर, अनिल पाटील भेदोडकर आदींनी अभिनंदन केले आहे.