श्री भद्रनाग स्वामी मंदिरात उफाळला जनसागर
हर हर महादेवाच्या गजरात दुमदुमली ऐतिहासिक भद्रावती नगरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सर्वदूर प्रसिद्ध व पावन समजले जाणारे दुर्मिळ असे श्री भद्रनाग स्वामी देवस्थान मंदिर भक्तांच्या आस्थेचे प्रमुख ठिकाण आहे. एरवीपेक्षा नागपंचमी व महाशिरात्री या दिवशी सर्वदूर विदर्भातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींचे दुर्लभ दर्शन घेऊन धन्य मनाने स्वगृही जातात.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री भद्रनाग स्वामी मंदिर येथे जनसागर उफाळला होता. असंख्य स्त्री पुरुष भाविकांनी यावेळी स्वामी दर्शनाचा लाभ घेतला. परिसरात विविध उपवासाचे खाद्यपदार्थ, विविध खेळणी दुकाने, विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आल्याने धार्मिक उत्सवातून छोट्या व्यावसायिकांना चार पैसे पदरी पाडता आले. सर्वत्र भक्ती, हर्षमय, आनंदी, व चैत्यनमय वातावरण पसरल्याचा अनुभव येत होता.
श्री.स्वामी भद्रनाग देवस्थान समितीच्या वतीने भाविकांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर दक्षता बाळगली होती. तद्वतच भद्रावती पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने विशेष खबरदारी बाळगत चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शहरातील स्वयंसेवी संघटनांनी निःस्वार्ध योगदान देत महाशिव रात्री उत्सव निर्विघ्न पार पाडण्यात मोलाचे योगदान दिले.
महाशिवरात्रीचे अवचित्य साधुन हजारो भाविक भक्तांनी भद्रावती येथील ऐतिहासिक भद्रनाग मंदिरातील शिवलिंगाचे तसेच भद्रनागाचे दर्शन घेतले.
*महाशिवरात्री भद्रनागाची विशेषता*
महादेवाला जाऊन आल्या नंतर भक्त घरी न जाता प्रथम भद्रनागमंदिरात येऊन दर्शन घेऊन व एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडूनच घरी जातात त्या मुळे महाशिवरात्रि च्या दोन दिवसा पासुनच मंदिराचा परिसर भक्तांनी फुलत असतो. एकादशीचेे दिवशी परिसरातील भक्त ही शिवलिंगाच्या दर्शनासाठी येथे येतात त्यामुळे या दिवशी येथे यात्रा भरत असते.
अनेक समाज सेवी संघटनांन तर्फे या दिवशी येथील भक्तांना उपवासचे पदार्थ मोफत वितरित करन्यात येत असते.
मंदिराच्या वतीने हरिनाम सप्ताह सुरु असून भाविकांना कुठलाही त्रास होऊ नए व सहज दर्शन मिळावे या करिता पोलिस बंदोबस्त ठेविल्या जाते. हरिनाम सप्ताहात भजन, कीर्तन, ग्रामस्वच्छता, काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.



