कोरपना येथे शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे व आदिवासी नेते उत्तमजी गेडाम यांचा भाजपात प्रवेश
आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश ; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कोरपना येथील शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे तसेच आदिवासी समाजाचे नेते उत्तमजी गेडाम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोरपना तालुक्यातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून, या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, नगरसेवक सुभाष हरबडे, नगरसेवक तथा आदिवासी नेते अरुण मडावी, किशोर बावणे, ओम पवार शहर महामंत्री अबरार अली, सत्यवानजी घोटेकर, पुंडलिक उलमाले, पवन बुरेवार, संतोष बोरडे, अभय डोहे, मोबीन बेग, सुनील देरकर, प्रमोद गिटकर, विनोद कुमरे, धनराज सरपंच, उमेश कोल्हे, उमेश पालीवाल आणि विठ्ठल तुमराम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन परिसराच्या विकासासाठी काम करण्याची अपेक्षा या पक्षप्रवेशातून व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर भाजपाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे कोरपना तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक बळात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



