ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुंगीकारक संवेदनशील औषधीची विक्री करणा-या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम राबविली असुन, सदर मोहिमेदरम्यान दिनांक 28 नोव्हेंबर 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे अर्शद रऊफ खान, रा. रत्नाबाई स्कुलजवळ वार्ड नं. 14 महादेवपुरा वर्धा यास त्याचे राहते घरी जावुन चेक केले असता, तो मोक्कावर रंगहाथ शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुंगीकारक संवेदनशील औषधीची डॉक्टरांची चिठ्ठी(प्रिस्क्रिप्शन) शिवाय विक्री करतांना मिळुन आला असुन, त्याने सदर औशध हि गैरमार्गाने तौफिक शेख रा. महादेवपुरा वर्धा याचेकडुन खरेदी केल्याने, जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपी अर्शद खान याचे ताब्यातुन Nitrazepam Tablets IP Nitrapal-10 च्या 30 गोळ्या, नगदी रक्कम व मोबाईलसह जु.कि. 6,199 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे तसेच, गुंगीकारक औषध अवैध खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाराच्या श्रृंखले मधील सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. सिनुकुमार बानोत, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये