प्रलंबित ई चालान दंड भरण्याची सुवर्णसंधी !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वाहनांवर प्रलंबित असलेल्या ई चालान दंडाची रक्कम भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नागरीकांना मोठी सवलतीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ” महाराष्ट्र वाहतुक पोलीस चालान अभय योजना २०२६” राबविण्यास मान्यता देण्यात आली असून ही योजना दिनांक ०१ डिसेंबर २०२६ पासून लागु करण्यात येणार आहे.
या योजने अंतर्गत पात्र प्रलंबित ई चालानांच्या दंडाच्या रक्कमेवर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ई चालाने निकाली काढून वाहन धारकांना आर्थीक सवलतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
योजनेचे तीन महत्वाचे टप्पे
१) एकवेळ सवलत योजना (One Time Concession)
दिनांक २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या दोन्ही दिनांकासहच्या कालावधीत बजावण्यात आलेली आणि योजना सुरू होण्याच्या दिवशी वसुलीसाठी प्रलंबित असलेल्या पात्र चालानांच्या एकूण थकीत तडजोड रकमेवर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ०१ डिसेंबर २०२६ पासून ते ३० डिसेंबर २०२६ पर्यंत लागु करण्यात येणार आहे.
२) लवकर भरणा योजना (Early bird Scheme) ही योजना दिनांक ०१ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेबर २०२७ या एका वर्षाच्या कालावधीत बजावण्यात येणा-या पात्र चलानाची सवलतीनंतर देय रक्कम, संबंधित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने वाहन धारक अथवा नोंदणीकृत मालकाने, चालान विधीपुर्वक बजावल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांचे आत चालान रक्कम भरणा-या वाहन धारकांना २० टक्के सवलत लागु करण्यात येणार आहे.
३) न्यायालयात प्रलंबित ई चालानासाठी सवलत ही योजना दिनांक ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत जारी करण्यात आलेल्या आणि यापुर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तडजोड पात्र ई चालान खटल्यामध्ये या योजने अंतर्गत २० टक्के सवलत दंडाच्या रक्कमेमध्ये देण्यात येणार आहे. ही योजना दिनांक ०१ डिसेंबर २०२६ पासून ३० दिवसांसाठी लागु राहील. सदर योजना ही मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपीच्या स्वेच्छेच्या संमंतीने तसेच मा. न्यायालयाच्या आदेशाने करावी. या खटल्याचा निपटारा हा मा. न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात येईल.
” ई-चालान थकीत राहील्यास वाहन सेवा संबधित सेवा स्थगित होवू शकतात, लायसन्स निलंबित होवू शकते. तसेच वाहन जप्तीची नियमोचित कारवाई होवू शकते. “
नागरीकांना महत्वाचे आवाहन ई चालान दंडाची रक्कम केवळ खालील अधिकृत ठिकाणीच भरावी.
१) जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील कार्यालय येथे
२) जिल्हा वाहतुक शाखेचे अंमलदार यांचेकडे
३) संबंधित पोलीस स्टेशन येथे वाहतुक पोलीस अंमलदार यांचेकडे सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.
मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंक व व्हाटसअॅप, एस.एम.एस. वर लिंक ओपन करून दंड भरू नये.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाईन दंड भरू नये.
अनोळखी वेबसाइडवर वाहन कमांक, बँक खाते तपशील, ए.टी.एम. डेबीटकार्ड माहीती किंवा ओटीपी शेअर करू नये.
तरी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे वाहन धारकांना आवाहन करण्यात येते की, वाहन धारकांना वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपल्या वाहनांवर ई चालान प्रलंबित असल्यास, नागरीकांनी आपल्या चालानाची स्थिती तपासून योजनेच्या पात्रतेनुसार निर्धारीत कालावधीत दंडाची भरून व २० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
वाहतुक नियमांचे पालन करा, प्रलंबित ई चालानाचा निपटारा करा, सुरक्षित प्रवासाचा संकल्प करा !
(विजयकुमार घूले)
सहा. पोलीस निरीक्षक
जि.वा. नियंत्रण शाखा, वर्धा



