ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत घरातून तीन तलवारी, खंजर जप्त : गुन्हे शोध पथकाची कारवाई

१३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, एकाविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत खापरी वॉर्ड क्रमांक ३ येथील एका इसमाच्या घरातून तीन तलवारी आणि एक खंजर अशी चार घातक शस्त्रे जप्त केली. या शस्त्रांची एकूण किंमत १३ हजार रुपये असून, याप्रकरणी गोविंदा मारोती बावणे (वय २६) याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार खुशाल कावळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खापरी वॉर्डातील गोविंदा बावणे याच्या घरी पंचांसमक्ष झडती घेतली. यावेळी तीन तलवारी आणि एक खंजीर आढळून आले. पोलिसांनी ही चारही शस्त्रे जप्त केली.

या प्रकरणी पोलीस अंमलदार खुशाल कावळे यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६८८/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार, देवानंद डुकरे, अनुप आस्टूनकर प्रशांत शेंद्रे पोलीस अंमलदार योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली गारघाटे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये