ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिपाली राठोडनी गाजवली दिल्ली विधानसभा

पहिल्या बाल संसदेची बनली एकमेव आयकॉन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नागपूर :_ दिल्ली येथील ऐतिहासिक विधान सभेत पहिल्यांदाच पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि मानव रचना इंटरनॅशनल स्कूल द्वारे बाल संसदेचे आयोजन 7 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.संपूर्ण भारतातून हजारो विद्यार्थ्याच्यां चाचपणीतून काही महत्वपूर्ण निकषाच्या आधारे भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून 94 सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यातून 68 सदस्यांना वेगवेगळे खाते वाटप करण्यात आले होते.संपूर्ण महाराष्ट्रातून 6 सदस्य निवडले गेले त्यात डॉ.आंबेडकर कॉलेज,दिक्षाभूमी नागपूरच्या इयत्ता बारावी व अकरावी च्या कु.दिपाली आणि कु.अंजली श्रीपत राठोड या दोन सख्या बहींनीची निवड झाली होती.कु.दिपाली राठोड या केंद्रीय कबिनेट मंत्र्याची भूमिका बजावली होती.

तिला कोळसा मंत्रालय मिळाले तर कु.अंजली राठोड यांना विरोधी पक्षातील कोळसा मंत्रालयावर आपले विचार व्यक्त करायची जबाबदारी प्राप्त झाली होती.या ऐतिहासिक पहित्या बाल संसदेत संपूर्ण देशातून या दोन बंजारा बहीणींना संधी प्राप्त झाली होती, तेही एकाच कुटूंबातील.आपल्या अभ्यासपूर्ण,विवेकपूर्ण शैलीने दिल्ली विधानसभेत त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर जबरदस्त छाप सोडल्या.कु. दिपाली राठोड या ऐतिहासिक बाल संसद 2026 एकमेव बाल संसद आयकॉन (Baal Sansad ICON) ठरल्या. अगदी दोन मिनिटांच्या आपल्या दिल्ली विधान सभेतील भाषणांनी सर्वाची मने जिंकली. बाल संसदेत सहभागी देशातील सर्व सदस्यांकडून कौतुकांचा वर्षाव सुरू झाला.

विधान सभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेले वडील श्रीपतभाऊ राठोड आणि आई सौ.जयश्रीताई राठोड यांना आनंदाचे अश्रू अनावर झाले.याप्रसंगी अनेक मान्यवरांचा सहवास त्यांना मिळाला.कार्यक्रमाच्या उट्घाटन सोहळ्याला मा.विजेंद्रजी गुप्ता, स्पीकर विधान सभा,दिल्ली आणि अनेक मान्यवर लाभले होते.तर पुरस्कार वितरण व समारोपीय कार्यक्रमासाठी मा.मोहनसिंग बिस्ट,डेप्टी स्पीकर,दिल्ली विधान सभा यांच्या सह अनेक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती होती.भारतील या पहिल्या बाल संसद 2026 च्या यशस्वीतेसाठी मा.गोपाल आर्या यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यावरण संरक्षण गतिविधी कार्यकर्त्यासह अनेकांचे मौलिक सहकार्य लाभले.समाजबांधवाचे प्रोत्साहन, अनेकांचे मार्गदर्शन, जिद्द,चिकाटी व आईवडिलांचे संस्कार यामुळेच यशोशिखर गाठता आले असे कु. दिपाली व कु. अंजली राठोड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये