प्रा. डॉ. संजय हर्षे यांचे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन इंटरनॅशनल ह्युमन राईटस् एम्बेसडर ऑरग्नायझेशन, शांती मार्ग एन.जी.ओ. न्यू दिल्ली अंतर्गत आत्मनिर्भर भारत नॅशनल कॉनक्लेव्ह २०२६ तर्फे ६ फरवरी २०२६ ला वायएमसीए, व्हीआयपी हॉल, न्युदिल्ली येथे श्री. मा.ना. रामदासजी आठवले, मिनीस्टर ऑफ सोशल जस्टीस अँड एम्पपॉवरमेंट भारत सरकार यांचे शुभ हस्ते प्रा. डॉ. संजय प्रभाकरराव हर्षे, माजी प्राचार्य ब्रम्हपुरी, जि. चंद्रपुर, महाराष्ट्र भारत यांना “लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड युनायटेड किंगडम सर्टीफीकेट” त्यांचे सोशल वर्क, शिक्षण, व हेल्थ केअर संबधात प्रदान करण्यात आले. हे सर्टीफिकेट डॉ. अविनाश डी. साकुंडे इंटरनॅशनल चेअरमन भारत यांचे हस्तक्षाराने प्रमाणित केले गेले असुन लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद ‘सर्टीफिकेशन नं. LBOWRE502031 दि. ०६/०२/२०२६’ अशाप्रकारे करण्यात आलेली आहे. प्रा. डॉ. हर्षे हे इंटरनॅशनल ह्यूमेन राईटस जस्टीस फेडरेशन १९५२, इनकॉरपोरेटेड अन्डर द लेजीसलेशन ऑफ गर्व्हनमेन्ट ऑफ इंडीयाचे १८ वर्षापासुन व्हीआयपी एक्जीकेटीव्ह, नॅशनल मॉडरेटर, व अॅक्टीव्ह मेंबर आहेत.
तसेच आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन, इंडीयन गॅलेक्सी फॉऊंडेशन न्युदिल्ली, (Act 1882 Govt of India. Regd. 1190) इंटरनॅशनल हह्युमन राईटस एम्बेसडर ऑरगनायझेशन भारत मंच ट्रस्ट न्युदिल्ली तर्फे प्रा. डॉ. संजय हर्षे यांना “नॅशनल एक्सलेंट सोशल सर्विस अवार्ड २०२६”, चिफ गेस्ट मा. बालमिकी प्रसाद सिंग फार्मर गव्हर्रनर ऑफ सिक्कीम यांचे शुभ हस्ते १८ जाने २०२६ ला कॉन्सटीट्यूशन क्लब ऑफ न्युदिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
तसेच या संघटने अंतर्गत आत्मनिर्भर भारत नॅशनल कॉलक्लेव्ह तर्फे प्रा. डॉ. संजय हर्षे यांना नॅशनल ग्रेट इंडियान अवार्ड २०२६, चिफ गेस्ट श्रीमती सुरेख लांबतुरे मेंबर एक्स नॅशनल कमीशन फार शेड्युल कॉस्ट भारत सरकार यांचे शुभ हस्ते २४ जाने २०२६ ला कॉन्सटीट्युन क्लब ऑफ न्युदिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
या व्यतिरिक्त या संस्थेतर्फे “नॅशनल सोशल सर्वीस एक्सलंट अवार्ड २०२५ ” चा पण पुरस्कार प्रा. डॉ. संजय हर्षे यांना २६ नोव्हे २०२५ ला न्यु महाराष्ट्र सदन न्युदिल्ली येथे चीफ गेस्ट श्री. प्रतापराव जाधव ऑनररी मिनीस्टर ऑफ स्टेट फार आयुष I/C यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
आजपर्यंत प्रा. डॉ. संजय हर्षे यांना स्टेट, नॅशलन व इंटरनॅशनल ९५ प्लस पुरस्कार व सम्मान प्रदान झाले आहे. हे सर्व त्यांच्या निस्वार्थ समाजकार्याची पावती म्हणुन समजले जाते. या पुरस्कारा बद्दल त्यांचे अनेकांनी शुभेच्छा देऊन हार्दिक अभिनंदन केले व करीत आहे.



