ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकी वाहन जळून खाक

वरोरा तालुक्यात धक्कादायक घटना: मार्डा रोडवर कुणबी भवनजवळ दुचाकी अचानक पेटली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

वरोरा : (श प्र )वरोरा तालुक्यातील मार्डा रोडवर कुणबी भवनच्या बाजूने जाणाऱ्या नवीन हायवेजवळ एक भीषण अपघात घडला. वडगाव येथील रहिवासी श्री प्रमोद पिंपळशेंडे यांच्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले. ही घटना आज दुपारी घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, श्री पिंपळशेंडे आपल्या दुचाकीने मार्डा रोडवरून जात असताना अचानक वाहनातून धूर येऊ लागला आणि क्षणार्धात दुचाकीला आग लागली. आग एवढी भयानक होती की, चालकाला वाहन थांबवून जीव मुठीत धरून बाजूला पळावे लागले. वाहन विझवण्याचा कोणताही प्रयत्न करण्याआधीच आगीने रौद्र रूप धारण केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये