ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चंद्रपूर जिल्हा तिरळे कुणबी समाजातर्फे महापौर संगीता खांडेकर यांचा जाहीर सत्कार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा तिरळे कुणबी समाजाचे मागील ३० वर्षापासून समाजाचे अध्यक्ष असलेले श्री. राजेंद्र खांडेकर यांच्या पत्नी संगीता राजेंद्र खांडेकर या चंद्रपूर शहराच्या प्रथम नागरीक (महापौर) झाल्याबद्दल समाजातर्फे जंगी सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, उपाध्यक्ष मोहन चौधरी, सचिव गजानन चौधरी, वामनरावजी गायकवाड, नानाभाऊ इंगोल, श्रीकांत करडभाजने, प्रमोद राऊत, संजय धोटे, सुनिल काळे व असंख्य समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.



