ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत कीटकनाशक फवारणी व बांबुलागवड विषयक कार्यशाळा संपन्न

तालुक्यातील शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          कृषी विभाग, पंचायत समिती भद्रावती यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच बांबुलागवड या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तेच होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, मंडळ कृषी अधिकारी विजय कवाळे, बांबुलागवड समन्वयक नितीश पटकोटवार, कृषि विस्तार अधिकारी प्रमोद ढोरे व सुहास पाटेवार उपस्थित होते. कार्यक्रम गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा योजनेअंतर्गत सिंचन विहीर, विहीर दुरुस्ती व इनवेल बोर मंजूर लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी डॉ. बंडू आकनुरवार, विजय कवाळे व नितीश पटकोटवार यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या विविध योजना, पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी, तसेच अटल बांबू समृद्धी योजना व राष्ट्रीय बांबू अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी महेंद्र डाखरे यांनी केले. सूत्रसंचालन कृषि विस्तार अधिकारी प्रमोद ढोरे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष पाटेवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये