ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा नगर पंचायत चे नगर सेवक गणेश वासलवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 28 तारखेला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. मात्र हा दिवस केवळ केक कापून किंवा उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता, समाजाप्रती आपली जबाबदारी जपत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून प्रोत्साहन देणे, वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

आपल्या आनंदाचा काही अंश इतरांच्या जीवनात आनंद, आशा आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी उपयोगी पडला, तर त्यापेक्षा मोठी वाढदिवसाची भेट दुसरी कोणतीही असू शकत नाही.यावेडी अतुल वाकडे अभिषेक बद्दलवार बालाजी मेश्राम नंदू बोराडे उराडे माहेश्वरी वासलवार व सर्व मित्र परिवार समाजहितासाठी केलेले छोटेसे कार्यही भविष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते.

“वाढदिवस साजरा करूया समाजसेवेच्या भावनेने… माणुसकीचा संदेश देत, आनंद वाटत आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देत!”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये